Monday, January 13, 2014

किल्ले राजगड जानेवारी २०१३

हा मंडळाचा पहिला ब्लॉग. (शेवटचा नसावा अशी मी आशा करतो.) चूकभूल असल्यास मंडळ क्षमेच्छुक आहे.

शनिवार दि. १९ जानेवारी च्या संध्याकाळी मंडळाचे अध्यक्ष बहुतेक त्यांच्या "धकाधकीच्या" जीवनाला लय कंटाळले असावेत, म्हणून रविवारी कुठेतरी जाऊया असा प्रस्ताव त्यांनी आमच्यासमोर मांडला. आम्ही गान्डीला आलेली खाज खाजवून घालवण्यासाठी, "अतिउत्साहाने", किल्ले राजगड चा प्रस्ताव मांडला. अध्यक्षांकडून होकाराची शक्यता तशी कमी होती..तरीपण अध्यक्ष "कल कुच तुफानी करते है" च्या मूड मधे होते कि काय, अध्यक्षांनी आमच्या प्रस्तावाला बिनविरोध मान्यता दिली. आम्ही खुश ओ..ऑफिस मधे असून पण आम्ही हा क्षण साजरा केला (अर्थातच, आमच्या बॉस ला शिव्या देऊन आणि ऑफिस मधल्या पोरांची खुळ्यात काढून.) बर अध्यक्ष, मी तयार झालो. पण मंडळाचे वरिष्ठ, काका (प्रेमाने-काक्के) यांच्याशिवाय "ट्रेक" होणे शक्य नव्हते. काकांनी कधी नव्हे ते "शून्य मिनिटात व्होट्स-एप वर रिप्लाय" करून होकार कळवला. काकांनी रीसंटली घोड्याच्या लवड्यायेवढी लेन्स खरेदी केली होती, बहुतेक त्यांना त्याची परीक्षा घ्यायची होती कि काय म्हणून शून्य मिनटात लेन्स साठी ट्रायपोड आणायला पण गेले. काकांच्या येण्यामागे मंडळ काकांचे नाही तर त्या टेमरॉन लेन्स चे आभार मानू इच्छिते. मंडळ आशा करते कि काकांनी पुढे जाऊन हत्तीच्या लवड्यायेवढी लेन्स घ्यावी आणि अशाच इंथूझीएजम ने अपकमिंग ट्रेक मधे सहभाग घ्यावा. बर अध्यक्ष, काका आणि मी. बाकी मंडळाचे आधारस्तंभ मयूर, अभिषेक, सुनील यांना आम्ही ओलरेडी कंसीडर केले होते. पण अभिषेक यांनी घात केला. त्यांच्या अचाट बुद्धीचा वापर करून काहीतरी पुचाट कारण पुढे करत त्यांनी त्यांचा नकार कळवत काढता पाय घेतला. त्यांनी अशा रीतीने नकार दिला, कि त्यांना ५ मिनिटांपेक्षा जास्त कन्विन्स करण्याची कुणाची हिम्मतच नाही झाली. असुदे असुदे अभिषेक.. "देअर इज ओलवेज नेक्स्ट टाईम". मयूर आणि सुनील यांना ग्रांटेड समजलेलो. पण सुनील यांना त्यांच्या "हेल्थ" ची हूर हूर लागून होती. बहुतेक त्यांनी किरकोळ मधे स्वप्न बघितले असावे. (राजगड वर आपण चढतोय...खूप दम लागलाय...अचानक बी.पी. वाढला...नाही.....................) खूपच उदास चेहरा करून त्यांनी मजबुरी पुढे केली. पण काका आणि अध्यक्ष यांनी हा ट्रेक कसा बेनिफिशियल होऊ शकतो ह्याची उत्तम उदाहरणे देऊन त्यांना कन्विन्स केलेच. मला एक डाउट आला होता..सुनील चा नक्की हेल्थ चा इशू होता कि अंक्स सोबत काही डाव होता काय कि..!! मयूर सर हे तयार असणार माहिती होतं..पण ते कितपत मनापासून तयार होते ह्याचे उत्तर देवाला सुद्धा माहिती नसावे. त्यांच्या "सगळे म्हणतायत म्हणून" च्या मथळयाखाली ते कुठेही कुणासोबतहि जायला तयार होतात. असो..मंडळाकडे त्यांच्या मनाचा विचार करायला वेळ नव्हता.. बट वी लवड (loved) देट यु केम. मंडळ होप्स देट यु इंजोय्ड. आणि मधेच मंडळाचे आचारी सुजित यांचा मेसेज टपकला.. प्लान नेक्स्ट विकेंड ला ठरवूया म्हणून.. मंडळ खतरनाक द्विधा मनस्थितीत पडले. आता काय करायचं.... सगळेच अनुत्तरीत..!! आचारी यांना नेक्स्ट ट्रेक ला नक्की न्यायचं असा ठराव करून आचार्यान्ना अनुत्तरीतच ठेवण्यात आलं. लोल!! पण सुजित..तुमच्या साठी अध्यक्ष आणि सुनील यांनी मिळून एक आगळा वेगळा प्लान ठरवला होता. तुम्हाला रविवारी पहाटे डायरेक्ट राजगडच्या पायथ्याशी बोलवायचे असा काहीतरी चाललं होतं बाबा..!!

मीनव्हाईल मयूर सरच्या ऑफिस जवळच्या दाल-तडका फेम खानावळीत शेव भाजी आणि ऑफ कोर्स दाल-तडका डिनर साठी घेण्यात आला. अध्यक्ष त्यांच्या जीव कि प्राण गोहाड मेस ला निघून गेले होते. मी आणि सुनील नि ट्रेक साठी खादीचे सामान खरेदी केले..

अध्यक्ष, काका, अर्थमंत्री, मी आणि सुनील अशे ५ कार्यकर्ते तयार झाले. मधेच माझी गांडीची खाज वाढली आणि म्हणले आपण नाईट ट्रेक करूया. पण मला एकाकी पाडून सर्वमताने आमची मागणी धुडकावून लावण्यात आली. आणि गेस बत्ती घेऊन जायचा विचार पण अशाच रीतीने धुडकावून लावण्यात आला. सकाळी ६ ला निघायचे असे ठरवून उदास गांडीने मी घरी झोपायला आलो.

ठरल्याप्रमाणे मी उठून ५.१५ ला मयूर सर ना फोन केला. एक कप कॉफी मारून ६.४५ ला काकांना फोन केला तर काकांनी "तू येईपर्यंत आवरतय" अस डळमळीत आश्वासन दिले. म्हणलं आता हेंनी घोळ केलाय १०१% म्हणून अजून ५-१० मिनिटे टाईम पास करून निघालो. तिथे पोहोचलो तर अल्मोस्ट सगळ्यांचं आवरलं होत. सुनील यांनी चक्क अंघोळ केली होती हे ऐकून आमचं मन बिना अंघोळीचच प्रसन्न झालं. आणि अर्थमंत्र्यांनी सांगितले अध्यक्ष अजून झोपलेले आहेत त्यांना उठवा.. मला ओनेस्टली राग आला नव्हता..पण मन उदास झालं होतं. आईला..प्लान केला आणि गंडवलं मंडळ सगळं अध्यक्षांनीच..! :( :( अध्यक्षांना २-३ हाका मारल्या तर ते "तुम्ही जावा..मी काय येत न्हाई.." मी म्हणलं चला राहूदे.. बघतो तर काय...अध्यक्ष तयार होऊन झोपलेले. आणि सकाळ सकाळी मला "ट्रोल" करण्यात आलं होतं..म्हणे "आम्हाला तुझी रिअक्शन बघायची होती." सुटकेचा श्वास टाकून ७.१५ ला निघालो.

अर्थमंत्री ठरल्या प्रमाणे आमच्या मागे पाशन वर, मोठ्या सी.सी. ची गाडी चालवण्यास उत्सुक असलेले काका आणि त्यांच्या मागे हेल्थ कॉशस सुनील. आणि द बॉस अध्यक्ष त्यांच्या ग्लामर वर एकटे..(FYI अभिषेक: त्यांच्यावर हि वेळ फक्त तुमच्यामुळे आली होती.)

नसरापूर फाट्यापर्यंत थंडी बिअरेबल होती. पण तिथून पुढे मात्र सगळा कार्यक्रम गंडला. थंडी अनबिअरेबल.. थंडी कमी होता होईना आणि २३ किलोमीटर चा रस्ता संपता संपेना. आम्ही पुढे आलो होतो.. काका आणि अध्यक्ष मागे राहिले होते. शेवटी राजगड च्या फाट्याला आम्ही थांबलो आणि वाट बघू लागलो. अर्थमंत्र्यांची हालत खराब झाली होती थंडीने, पण "सगळे म्हणतायत म्हणून" मुळे मूग गिळून गप बसले होते. आमची पण हालत वाईट झाली होती. हाताची बोटं वाकडी ती वाकडीच.. ती धड सरळ करता येईनात आणि बेंड पण करता येईनात.. ५ मिनटात काका आणि अध्यक्षांचे आगमन झाले. वेळ कुठे लागला हे विचारले असता खतरनाक कारण ऐकण्यात आले. काकांना मुतायला आले होते आणि थंडी मुळे पेंट च्या चेन काढण्यापासून प्रोब्लेम येत होते म्हणे.. कित्येक असफल प्रयत्नांनंतर अध्यक्षांनी जातीने यामध्ये लक्ष घातले आणि स्वतः चेन काढून देण्याची ऑफर केली. लोल..!! पण नुसतं चेन काढून फक्त ३०% बेटल विन.. चड्डीतून लवडा बाहेर काढायचं टास्क हे अशक्यप्राय होते. पुढचा कार्यक्रम काय आणि कसा झाला हे काकांनाच विचारा..!!

गुंजवणे गावात ८.२५ ला आगमन झाले आणि मेन चौकातल्या पारावर ब्यागा टाकल्या..पोह्यांची ऑर्डर देण्यात आली. आणि एक किरकोळ शेकोटी गावकऱ्यांनी पेटवलेली होती त्यात अर्थमंत्री, सुनील आणि मी घुसखोरी करत गावकऱ्यांना बाजूला केले..! पोहे म्हणल्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांना काय होतंय कुणास ठाऊक..जेवायलाच बसले...!! प्रत्येकी २ प्लेट गळभर पोहे खाल्ल्यानंतर चहा..!! तिथे तब्बल पाउण तास निव्वळ टाईमपास करून ९.१५ ला मंडळाने ट्रेक ला सुरुवात केली.

काकांसाठी हा ट्रेक "ट्रेक" नसून एक फोटोग्राफी एक्सपीडीशन होतं. दिसली जागा..लाव ट्रायपोड!! दिसली जागा..लाव ट्रायपोड!! लॉल..!!

काकांचा सगळ्यात पहिला ट्रायपोड स्टोप:
आमच्या पण छोट्या गरीब कॅमेरा ने काढलेले फोटो..

गड अजून ५% पण पार केला नव्हता आणि कार्यकर्ते गंडले. आणि याला सपशेल गळभर खाल्लेले पोहे आणि गेले आठवडाभर खाल्लेले मेक-डी चे प्रोडक्ट्स यांना दोषी धरण्यात आले होते. काकांनी तर "आपलं वय झालं" असं डिक्लेअरच करून टाकलं!!
अधून मधून ताक-लिंबू सरबत विकणाऱ्या म्हाताऱ्या बायका त्यांच्या भवानी करायच्या मागे लागल्या होत्या. पण मंडळ यावेळी कुणाच्या हि इमोशनल ब्ल्याक मेल ला बळी पडणार नव्हते.

अनपेक्षितपणे अध्यक्ष मंडळाला लीड करत होते. लॉल. ज्या माणसाची आम्हाला सगळ्यात जास्त काळजी होती तो माणूस मंडळ लीड करत होता..!! पण अध्यक्षांनी एक काशीत घातलीच.. मळलेली वाट सोडून गांडीत मस्ती म्हणून दुसऱ्या वाटेने काहीतरी स्वतःचे तर्क वितर्क लावत मंडळाची दिशाभूल केली. म्हणे "तसं वर चढून न्हाई जायचं..डोंगराच्या कड कडन जायचं". कशाच काय न काय..!! पुढ रस्ता संपल्यावर अध्यक्षांनी "कड कडन" माघार घेतली आणि मळलेल्या वाटेच्या दिशेने कुच केले. अध्यक्षांचा निर्णयाचा त्रास काकांना सहन करायला लागला. ट्रायपोड, कॅमेरा, त्यात घोड्याच्या लवड्यायेवढी लेन्स आणि भली मोठी ट्रेक ब्याग.. आणि त्यात झालेलं वय!! एवढं सगळं घेऊन, झाडा-झुडुपातून वाट काढत काका येत होते आणि दर ५-१० फुटला अध्यक्षांना कड कडन ऐकवत होते. शेवटी काकांनी ब्रेक घेतला आणि जीन्स काढून मिलिटरी ३/४थ घालून जरा स्वतःला फ्लेकझीबल केले. थोड्या वेळाने मळलेला रस्ता मिळाला. अध्यक्षांनी गिल्टी फील करून घेऊ नये. आफ्टर ऑल इट वॉज ए गुड एक्स्पीरीयंस.

कड  कडच्या वाटेतून बाहेर पडताना:



सुनील च्या गणितानुसार आम्ही दर १०० मीटर ला ब्रेक घेत होतो. हे गणित तेन केव्हा आणि कसं केला काय माहिती..



या (वरील) ठिकाणी मंडळाने तब्बल अर्धा तास टाईम पास केला. काकांना तर गडाचा ओसम व्ह्यू इथून मिळाला होता.

त्यात अध्यक्षांना मधूनच झुमले झुमले... आठवले आणि एकदम रंगात आले. या नादात त्यांनी पायात क्रेम्प पण आणला..!!


इथे बरेच सोलो फोटो सेशन करण्यात आले. काकांना एकटे पडू नये म्हणून ऑटो टायमर लाऊन एका वेळी १० फोटू काढायचं सेटिंग लाऊन ७-८  ग्रुप फोटो पण काढले. आता ते फोटू काकांना कधी सवड मिळत्या आणि कधी आम्हाला बघायला मिळत्यात कुणास ठाऊक..!!

ग्रुप फोटू नंतर तिथनं काढता पाय घेतला. इथून पुढ हेल्थ कॉशस सुनील ने मंडळ लीड केले. काका आणि अध्यक्ष मागं राहून हपापत येत होते. अर्थमंत्री कधी पुढ कधी माग...चालत होतं.."सगळ्यांच्या सोबत".

राजगड च्या दिशेने:

मधे मधे किरकोळ थांबून गप्पा चालत होत्या. उगी कसल्या पण विषयावर. जसे कि..
काका "व्हायग्रा" चे तत्वज्ञान सांगताना:

शेवटी अध्यक्षांचा संयम सुटला आणि त्यांनी एका बारक्या पोराकड ताक घेउयाच म्हणले. त्यात पण अध्यक्षांनी स्कीम केली. काकांना आणि सुन्या ला पहिला ताक घ्यायला लावलं आणि स्वतः सरबत घेतलंय. तेंचा फीडब्याक घेऊन मग चं नंतर ताक घेतलंय.

अध्यक्ष स्कीमा करत्यात..

एक पेला सरबत, ताक हाणून आगेकूच सुरु..


"काल" पिक्चर मधला काली संचारला हुता अध्याक्षांच्यात..त्या काठीसाठी अध्यक्ष, अर्थमंत्री आणि सुनील च्यात भांडणं!!

राजगड चा शेवटचा स्ट्रेच जवळ आला हुता. एव्हाना मंडळ बऱ्यापैकी गंडल हुतं. ५-५ मिनिट थांबत गाडी हळू हळू पुढ जात हुती. मधेच काकांचे अर्थमंत्र्यांना डोस दिले जात हुते.. बट अर्थमंत्री वॉज नॉट इंटरेस्टेड इन देट एट ऑल!! अर्थमंत्री वॉज इन हिज ओन मूड. "चढ गप वर" असं म्हणून काकांना गप बसवण्यात आल. लॉल!!

आणि सळया दिसल्या..सळया दिसल्यावर लई बर वाटलं. आली पद्मावती माची जवळ. वि वेअर अल्मोस्ट देअर. मी आणि सुन्या पुढे निघून आलो होतो. काका, अध्यक्ष आणि अर्थमंत्री लई मागे राहिले होते.

 

पाण्याचे  टाके. त्यात पाणी असतं तर लई बर वाटलं असत..!!

सळया चढताना काका. एग्रेशन च्या पोज चा इपिक फेल.

क्रेम्प  ने त्रस्त अध्यक्ष.

एव्हाना हेल्थ कॉशसनेस विसरलेले सुनील.

"सगळ्यांच्या सोबत" आलेले अर्थमंत्री.

एवढ सळया चढल्यावर ब्रेक तो बनता है!!


काय त्या गॉगल चं कौतुक..

आणि एकदाचा चोर दरवाजा आला..या चोर दरवाज्यातनं अध्यक्ष विथ हिज ब्याग मावणार नव्हते म्हने...

बराच वेळ ट्रायपोड बंद हुता. आता अध्यक्षांच्या आग्रहास्तव चोर दरवाज्याच्या इथं खोलून बसवण्यात आला. अध्यक्षांना स्वतः जातीने काकांचा सोलो फोटू काढायचा हुता..त्यासाठीचे कॅमेरा सेटिंग करायचे अध्यक्षांनी नाकाम प्रयत्न केले. अर्थमंत्री काहीतरी फालतू चे सजेशन पण देत होते. आणि शेवटी काकांनीच सेटिंग करून दिलं. अध्यक्षांनी फक्त बटन दाबायचं काम केल.

अर्थमंत्र्यांचे फालतू सजेशनस्..
शेवटी काकांचे सेटिंग..

तिथ एक बारकं पोरग ताक विकायला आल. कुणाला नको हुत. तेला घालवला. तेवढ्यात मला पोरानं बारीक आवाजात "काही खायला असलं तर द्या" असं म्हणलेलं ऐकायला आल. तेला बोलवून घेतला आणि पार्ले बिस्कीट चा १० वाला अर्धा पुडा तेला दिला. दानशूर मंडळ.

आनायशी क्यामेरा बाहेर हुता..त्या पोराबरोबर मंडळानं फोटू काढून घेतला..



ह्म्म्म.. तब्बल एक वर्षानंतर ह्यो अर्धवट ब्लोग माझ्या निदर्शनास आला आहे आणि तो कम्प्लीट करत आहे. क्षमस्व. आता इथून पुढच्या आठवणी एवढ्या ताज्या राहिलेल्या नाहीत. तरी बी आठवण्याचा प्रयत्न करतो.

इथं १५-२० मिनीट फोटूसेशन नंतर मंडळाने पद्मावती माची कडे कूच केलं.

पद्मावती तलाव:


पद्मावती तलाव (एरियल व्ह्यू):


बर इथं येक ष्टोरी हाय. पद्मावती तलावाच्या पहिल्या फोटू मधी जरा वरच्या अंगाला एक शेड दिसतंय. दिसलं का?? ते राजगडावरचं शासंनाच गेष्ट हाउस हाय. हि ष्टोरी तिथलीच हाये. ष्टोरी मधले क्यारेक्टर सगळ्यास्नि माहिती हायेत असं कन्सीडर करतो. तरी बी कंसात किरकोळ क्यारेक्टर डीस्क्रीप्शन लीवतो. २०१२ च्या मार्च महिन्यात मी (मी स्वतः) आनी काका (आपला काक्के) टीम "इन-डिक ट्रान्स" बरोबर राजगडावर आलो हुतो. तवा आम्ही नाईट ट्रेक केला हुता. त्यो नाईट ट्रेक सुरु रात्री १२-१ च्या दरम्यान केला हुता. ट्रेक सुरु व्हायच्या अदोगर पन लयी घडामोडी झाल्या हुत्या त्या नंतर सांगतो. त्या बी ऐकण्याजोग्या हायेत. देट इज डीफ्रंट ष्टोरी. बर कमिंग ब्याक टू धिस ष्टोरी, त्यो नाईट ट्रेक सुरु रात्री १२-१ च्या दरम्यान केला हुता आनी दमून-भागून अर्धे घामाळलेले पहाटे बहुतेक ३-४ च्या सुमारास पद्मावती माची ला पोहोचलो हुतो. मी, काक्के, अरविंद (आरव्या: सध्या एक्झिकॉम मधे असणारा) आणि आपटे सर ("इन-डिक ट्रान्स" च चौथं रत्न) तिघंजन तर्राट त्या शेडत गेलो कारन आमास्नी तीच सगळ्यात सेफ आनी थंड जागा वाटली हुती. तिथं पोहोचलो तर अदोगरच बऱ्याच ट्रेकर्स नि जागा आडवून धरली हुती. आमास्नी शेडत आत जायचं हुत पन आतल्या ट्रेकर्स नी दार लावून टाकलं हुत. आमि दमून आलेलो आणि तिथं बाहेर च आमास्नी लयी भारी वाटत हुत कारण गार गार वार आमच्या गरम गरम झालेल्या अंगाला लयी भारी मिठी मारत हुत. जरा बी विचार न करता काकांनी आनलेली चटई हातरली आनी दिली की तानुन. मधेच के.के. उर्फ कन्हैय्या काळे ("इन-डिक ट्रान्स" च दुसरं रत्न) आला आणि म्हनाला "तिकडे मंदिरात जागा आहे, येणार असाल तर चला". पन आमास्नी जनु काय तिथं स्वर्गच मिळाला हुता.. के.के. उर्फ कन्हैय्या काळे ला सरळ उडवून लावला. ५-१० मिनिट लयी भारी वाटलं पन नंतर आश्शी गांड फाटायला सुरुवात झाली, गार गार वाऱ्यान आमास्नी लयी जोरात मिठी मारली. काकांच्या भाषेत "त्या गार वाऱ्याचा अस्सा झोत पुढच्या भिंतीवर आदळून डायरेक्ट आमच्या अंगावर.." हळू हळू एकेकाच्या ब्यागेतून स्वेटर, चादरी बाहेर निघू लागल्या. एका चटईत चौघे जन एवढ्या प्रीसीजन ने झोपलो हुतो काय सांगाव तुम्हाला. ती २ का ३ तासांची सो-कॉल्ड झोप कशीबशी झाली आनी सूर्योदय झाल्यावर जीवात जीव आला.

मंडळ त्या शेड जवळ पोचल्यावर हि हाय तशी ष्टोरी मी अन काकांनी रिपीट केली मंडळाला आवर्जून सांगायला. पण बहुतेक जणांनी यामधे इंटरेस्ट घेतला नाही आणि आम्हाला एक्सपेक्टेड रीस्पोंस मिळाला नाही. असुदे काका.. शेवटी आपनच अनुभवलंय ते. यास्नी कळणार न्हाई. एकदा सगळ्यांना तिथं नेउन झोपवूया म्हनजे कळल. तरिपन इथून पुढ कधिपन राजगडावर मंडळ जाइल तवा तवा हि ष्टोरी रिपीट केली जाईल. "कंडोम कब कब.. यौन संबंध जब जब" सारखं.

पद्मावती माचीवर थोडा फेरफटका:





एकमेव अशे सदस्य हेल्थ कॉशस "सुनील" ज्यांनी कधी नव्हे ते अंघोळ केली होती.. म्हणून मंडळाने त्यांनाच सर्व मंदिरांच्या दर्शनाला मंडळाच्या वतीने पाठवले:


मंडळातर्फे सुनील ला दर्शन घ्यायला बराच वेळ लागत हुता. तवर हिकड मंडळाच परत एकदा फोटो शूट सुरु झालं हुत. ट्रायपोड परत अनफोल्ड करन्यात आला. १७६० फोटो काढल्यानंतर सुनील याचं आगमन झालं. त्यो येतोय असं दिसताच सगळ्यांच्या गांडीतला किडा वळवळला आनि सुन्याला गंडवायचं ठरवलं. अध्यक्षांनी सुन्याला सोलो फोटू साठी पोज घ्यायला सांगितले आनी फोटो काढतोय असं सांगून तेचं व्हीडीयो शुटींग करत हुते. खी..खी..खी..खी..!! सुन्याचे एकानंतर एक वेगवेगळे पोज बघण्यासारखे हुते. काकांना विनंती हाये कि त्यो व्हीडीयो शेअर करावा.

शेवटी टायमर लावून ग्रुप फोटू:



फोटू काढण्याच्या नादात मंडळ भुकेल आहे ते विसरून च गेलं हुत. काकांनी खायचा प्रस्ताव मांडला आनी खात खात पुढचा प्ल्यान करायचं ठरवलं. पन खायला सुरु करायला जागाच काय केल्या मिळत नव्हती. बघल ती सावली ची जागा कुणीतरी आडवलेली हायच. कसंतरी पद्मावती माचीच्या सदरेसमोर जागा दिसली. तिथ बी येक कपल विसावलेलं हुत. मंडळान जरा आढावा घेतला.. तेंच हुत आलंय ते बघितलं (जेवन खाउन बर का) आणि तिथ बसायचं  ठरवलं. पन खाऊन पिऊन होऊन पन कपल तिथन हलायचं नाव घेईना कि.. बसलं हुत टाईम पास करत तिथ सावलीत आनि आमी इथं तेंची उठायची वाट बघत उन्हात. आता मात्र निर्लज्ज होऊन तेंच्या शेजारी जाऊन बसल्याशिवाय ती काय तिथन हालत न्हाईत म्हनून बसलो सगळे जाऊन तिथंच. तरीबी हलायला तयार न्हाईत. शेवटी देव पावला आनी तेंचा अजून एक मेंबर तेंना बोलवायला आला. बर झालं.. तरीबी जाता जाता त्या छाव्याचा टाईम-पास. बूट काढून बसलेला ते घातला.. छावी ला शूज घालेपर्यंत थांबला.. जातो जातो म्हनत १०-१५ मिनिट तर सहज खाल्ली आई घाल्यांनी. गेले शेवटी..  पुच्चीचे.. सॉरी पोच्चीचे.. त्या सावलीवर आता आमच राज्य हुत.. सगळ्यांनी बूट काढून पाय पसरले. तवर हिकड ब्रेड जॅम निघाला हुता. पोटाला जरा आधार मिळाल्यावर बर वाटत हुत.

कपल जात नाही तवर अध्यक्षांनी घाम पुसून घेतला.
अध्यक्ष आनी तेंचा घाम:


आग्गायायायाया कसलं वल्ल झालाय बघ:

एव्हाना मी माझ्या अधुरे स्वप्न असलेल्या सुवेळा माची चे स्वप्न बघत होतो:


सावली के मालिक:


१२.३० वाजले असतील. पुढचा प्ल्यान म्हणजे मला सुवेळा माची ला जायचं हुत कारण मागच्या वेळी तिकडं जायचं हुकल हुत. आनी काका म्हणजे बालेकिल्ला धरून बसलेले. बाकीचं मंडळ न्यूट्रल हुत. कुठ जायचं तिकड चला. काकांच्या मते राजगड ला येउन बालेकिल्ला नाही बघितला मग काय राजगड बघितला.. मी म्हणजे मला सुवेळा माची ला जायचं हुत.. बालेकिल्ला गेल्यावेळी बघितला हुता. शेवटी असं ठरलं कि पहिला बालेकिल्ला सर करायचा आणि किती वेळ लागतोय हे बघून परत सुवेळा माची करायची. मंडळ बालेकिल्ला कडे निघालं. जाता जाता सुवेळा माची चा फाटा दिसता च मला माझं अधुर स्वप्न परत आठवलं आनी लवकर परत यायचं म्हणून सगळ्यांना सांगीतल.

तासाभरात बालेकिल्ला:



या दरवाज्यातून सुवेळा माची चे उत्तम दर्शन होते.  म्हणून काकांनी ट्रायपोड अनफोल्ड केला.

सुवेळा माची - एक स्वप्न:


सगळ्यांच्या माग बसून खुळ्यात काढण्यात व्यस्त अर्थमंत्री अनी हेल्थ कॉशस सुनील:


बालेकिल्ल्या च्या चढाई नंतर ते अख्खा राजगड उतरेपर्यंत अर्थमंत्री आणि सुनील यांचे सुत जुळले होते. शेवटपर्यंत एकत्र होते राव. काय झाल हुत ते त्या दोघांनाच माहित.
दरवाज्याच्या इथ लई लोकांची वर्दळ हुती. त्यामूळ काकांना फोटू काढायला अडथळा निर्माण होत हुता.

मधी येनार्याच्या आईचा दाना:


पद्मावती माची (बालेकील्ल्यावरून):

सुवेळा माची - एक स्वप्न:


अ ह.. मला नव्हे माग सुनील साहेब बघा:

बालेकील्ल्यावरील फेरफटका:











संजीवनी माची - दुसरे स्वप्न:

बालेकिल्ला जोडी:


मित्रहो मला माहिती आहे बालेकील्ल्यावर पन बरेच किस्से झाले असतील पन लक्षात येत नाहीयेत. पुन्हा येकदा क्षमस्व!!

२.३० वाजले असतील. परतीचा मार्ग धरावा: बालेकिल्ला उतरताना:



अर्थमंत्री आनी सुनील (बालेकिल्ला जोडी) पुढ निघून गेले हुते. उतरता उतरता मला माहिती हुत कुनाचा मूड नसणार हाये सुवेळा माची कड जायचा, तरीबी मी विषय काढलाच.. वरच्या फोटू मधल्या पोजिशन वरून दिसत होतं सुवेळा माची चा मार्ग. काकांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली. "अरे हार्ष्या ते अंतर दिसतंय तेवढं नाहीये.. मला विचार तिकडं जायला आपल्याला अजून एक तास लागल". झालं.. काकांनी नाही म्हणल्यावर अध्यक्ष म्हानालेच.. "आपल्याला घरी जायला लेट हुनार"!! काकांनी मला परत आल्यावर नक्की सुवेळा माची ला नेनार असे आश्वासन दिले. माझा मूड ऑफ झाला हुता. मी तर्राट पुढ निघून आलो.
सुवेळा माची - एक अधुर स्वप्न:

बालेकील्ल्याच्या पायथ्याहून सुवेळा माची कडे जाणारा मार्ग:





पुढ जाऊन थांबलेली बालेकिल्ला जोडी:

मागे राहिलेले जॉईन झाले:

३ वाजले हुते. इथ सुवेळा माची चा परत विषय झाला. मी अजून एकदा जाऊन येऊ असं म्हणल. तेव्हा परत एकदा वरचेच डायलॉग मला ऐकायला मिळाले. अंतर जास्त आहे.. तिथं पोहोचायला ४ वाजणार.. परत पद्मावती माची ला यायला ५.३० वाजणार.. थंडी चे दिवस आहेत.. अंधार लवकर पडतो.. ब्लाह, ब्लाह, ब्लाह..!! अर्थमंत्र्यांनी त्यांचा पेटंट डायलॉग मारलाच: "सगळे म्हणतील तसं"! काकांनी परत एकदा पुढच्या वेळी आल्यावर नक्की जाऊ असं आश्वासन दिलं आनी पद्मावती माची कडे कूच केलं.

सुवेळा माची.. एक अधुर स्वप्न:


३.१५ - पद्मावती माची च्या इथला शेवटचा स्टोप. इथनं खाली नॉन-स्टोप उतरायचं हुत. अर्थमंत्री के पैर मे छाले पड गये लगता है.


ऑन द वे डाऊन:



ओ हो.. स्लाईड..

बालेकिल्ला जोडी स्टील इन फॉर्म:


जोडी ब्रेकर काका:
 सुवेळा माची: एक अधुर स्वप्न:



आम्हाला सुचलेला फोटोग्राफी स्टंट.. बूट जोरात आपटायचा आनी साईड ने धूळ.. साउथ मूवी स्टाइल. सपशेल गंडलेला स्टंट:

अध्यक्षांचे ली-कूपर चे काळे बूट:


गुंजवने गावात खाली यायला ५ वाजले हुते. सुवेळा ला गेलो असतो तर खरच लेट झाल असत. पन नेक्स्ट टाईम "पहिला सुवेळा नंतर बालेकिल्ला" हाच नारा असणारे आमचा.
बहुतेक त्या हॉटेल मधे चहापानाचा कार्यक्रम मंडळाने केला हुता. आठवत नाही.

तर मग जानेवारी २०१४ सुरु आहे. जायचं का राजगड ला?